यंदा भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पंचांग आणि दिनदर्शिकांमध्ये आषाढी एकादशी बुधवार ९ जुलै रोजी देण्यात आली असून तेच बरोबर असल्याचे पंचागकर्ते व ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी कळविले आहे.
सूर्यसिद्धांत आणि ग्रहलाघव गणित पद्धती कालबाह्य़ झाल्याने १९५० पासून प्रमुख पंचागकर्त्यांनी दृकसिद्धांत गणित पद्धतीचा स्वीकार केला आहे व त्याप्रमाणेच भारतीय प्रमाणवेळेनुसार पंचांगे तयार केली जातात. जे आकाशात दिसते, तेच पंचांगात असायला हवे, असेही याबाबत बोलताना सोमण यांनी आपले मत स्पष्ट केले आहे.
भारत सरकारचे पंचांग, तसेच इतर प्रमुख पंचांगगांमध्ये देवशयनी भागवत एकादशी बुधवार ९ जुलै रोजीच देण्यात आली आहे.
स्मार्त एकादशी मात्र ८ जुलै रोजी आहे, असे दा.कृ. सोमण यांनी सांगितले.