जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये ५ लाखांचा ऐवज लंपास

पहाटे झोपेत असताना जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये आरक्षित बोगीत ४० ते ५० प्रवाशांच्या बॅगांची चोरी झाली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा माल चालत्या रेल्वेतून लंपास करण्याची घटना शुक्रवारी घडली. साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने मिरज स्थानकावर संतप्त प्रवाशांनी एक तास रेल्वे रोखून ठेवली.

  पहाटे झोपेत असताना जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये आरक्षित बोगीत ४० ते ५० प्रवाशांच्या बॅगांची चोरी झाली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा माल चालत्या रेल्वेतून लंपास करण्याची घटना शुक्रवारी घडली. साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने मिरज स्थानकावर संतप्त प्रवाशांनी एक तास रेल्वे रोखून ठेवली.
    जोधपूरहून बेंगलोरला जाणारी एक्स्प्रेस पुण्याहून पहाटे मिरजेकडे येण्यास निघाली. या गाडीच्या एस-८ या बोगीत असणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना पहाटे पावणेचार वाजता लक्षात आली. १० ते १२ वेळा साखळी खेचून गाडी थांबविण्याचे प्रयत्न झाले. मात्र गाडीच्या रक्षकाने गाडी थांबविण्यास नकार देत तशीच पुढे आणली. ही गाडी सकाळी १०.३० वाजता मिरज स्थानकावर येताच प्रवाशांचा संताप अनावर झाला. या चोरीप्रकरणी तक्रारी दाखल केल्याशिवाय गाडी मिरज स्थानकाबाहेर जाऊ  देणार नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता.
    गाडीतील चोरीप्रकरणी सहा प्रवाशांनी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात रीतसर चोरीची फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये नरपतसिंग पुरोहित (धारवाड), कनकमल टिंगड (उदयपूर), मेहूमल दुर्गानी (बेंगलोर), सुनील जैन (हुबळी), जयंतिलाल जैन (हुबळी) आणि रमेशचंद्र जैन (म्हैसूर) या सहा प्रवाशांनी आपले साहित्य चोरीस गेले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. यापकी कनकमल टिंगड यांच्या बॅगमधील २ लाख २२ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. याशिवाय अन्य प्रवाशांचे कपडे, मोबाइल, रोखड अशा ३ लाख ६२ हजार ५०० रुपये ऐवजाची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.  मात्र एस-८ या बोगीमधून प्रवास करणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांच्या बॅगा लंपास झाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Assets of 5 lakh stolen from jodhpur bangalore express

ताज्या बातम्या