‘खगोल निर्णय’चा भास्कराचार्य विशेषांक

भारतातील महान गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या ९०० व्या जयंती वर्षांनिमित्ताने त्यांच्याविषयी विशेष लेखांचा समावेश असणाऱ्या खगोल

भारतातील महान गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या ९०० व्या जयंती वर्षांनिमित्ताने त्यांच्याविषयी विशेष लेखांचा समावेश असणाऱ्या खगोल निर्णय-२०१४ च्या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष एच. एस. भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी हा अंक संपादित केला आहे.
या विशेषांकामध्ये भास्कराचार्य तसेच त्यांच्या सिद्धांतशिरोमणी या ग्रंथाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. भास्कराचार्याचे जन्मगाव पाटण (जळगांव), त्याकाळात वापरात असलेली नाणी, सुवर्णमापे, लांबीची परिणामे, धान्यमापे, काळाची परिणामे याविषयी रंजक माहिती या अंकात आहे. प्रा. मोहन आपटे, डॉ. गिरीश पिंपळे, हेमंत मोने, दिलीप जोशी, दा. कृ. सोमण आदींनी भास्कराचार्याविषयी लिहिले आहे. भास्कराचार्याविषयीचा एक लघुपट दा. कृ. सोमण आणि प्रा. मोहन आपटे तयार करीत असून तोही लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Astronomy calender

ताज्या बातम्या