मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी वाराणसीच्या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्सचे महाव्यवस्थापक बी. पी. खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुरकीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतलेले बी. पी. खेर नोव्हेंबर १९७७ मध्ये मध्य रेल्वेच्या सेवेत दाखल झाले. जबलपूर येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर यासह अनेक महत्त्वाची पदे त्यांनी ३५ वर्षांंच्या सेवेत भूषवली आहेत. उत्तर रेल्वेच्या जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख रेल्वे प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी कामगिरी पार पाडली आहे. उत्तर-मध्य रेल्वे आणि पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2013 रोजी प्रकाशित
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी बी. पी. खेर यांची नियुक्ती
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी वाराणसीच्या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्सचे महाव्यवस्थापक बी. पी. खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुरकीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतलेले बी. पी. खेर नोव्हेंबर १९७७ मध्ये मध्य रेल्वेच्या सेवेत दाखल झाले.
First published on: 02-05-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: B p kher appointed as general manager of central railway