भारिप बहुजन महासंघाची आज बैठक

भारिप बहुजन महासंघ पक्षाची नाशिक जिल्हा आढावा बैठक शनिवारी दुपारी १२.३० वाजता येथील खडकाळी चौकातील कुणाल प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नाशिक जिल्हा निरीक्षक प्रभाकर डांगळे यांनी केले आहे.

बैठकीत आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रामुख्याने चर्चा होणार असून नाशिक तालुका कार्यकारिणीची निवड करणे, आगामी निवडणूक व पक्ष प्रचार, तालुकानिहाय कार्यकारिणी निवडणे तसेच ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर प्रामुख्याने विचारविनिमय करण्यात येणार आहे. बैठकीस डांगळे हे मार्गदर्शन करणार असून बैठकीत प्रामुख्याने दीपचंद दोंदे, ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे, प्रा. गंगाधर अहिरे, वामनराव गायकवाड, नितीन भुजबळ, डॉ. संजय जाधव, प्रा. पी. के. घोडेराव, गोविंद भालेराव, नंदकिशोर साळवे, जयंत पगारे आदी उपस्थित राहणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bahujan republican party has meeting today

ताज्या बातम्या