भंडारा जिल्ह्य़ात १९६३ सिकलसेलचे रुग्ण

अनुवंशिक, तीव्र वेदनेचे मूत्रपिंड, यकृत निकामी करणाऱ्या शरिरातील लाल रक्तपेशींचा नाश घडविणाऱ्या, रक्तवाहिन्यांचे काम रोखणाऱ्या, हातापायांचे सांधे सुजविणाऱ्या, प्रसंगी अर्धागवायुकडे लोटणाऱ्या व तीव्र वेदना देणाऱ्या सिकलसेल रोगाचे पीडित श्रेणीतले ४६९,

अनुवंशिक, तीव्र वेदनेचे मूत्रपिंड, यकृत निकामी करणाऱ्या शरिरातील लाल रक्तपेशींचा नाश घडविणाऱ्या, रक्तवाहिन्यांचे काम रोखणाऱ्या, हातापायांचे सांधे सुजविणाऱ्या, प्रसंगी अर्धागवायुकडे लोटणाऱ्या व तीव्र वेदना देणाऱ्या सिकलसेल रोगाचे पीडित श्रेणीतले ४६९, तर वाहक श्रेणीतले १४९४ रुग्ण भंडारा जिल्ह्य़ात रुग्णालयांमधून नि:शुल्क रक्त, मोफत तपासण्या, औषधोपचार व डॉक्टरांचे समुपदेशन घेत आहेत.
या आजाराचे निदान रक्ततपासणी करून होते. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोल्युबिलिटी व इलेक्ट्रोफोरेसिस चाचण्यांची सोय आहे. येथील जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. मदन काटे म्हणाले, प्रत्येकाने रक्त तपासून आपण पीडित आहोत की निरोगी, याची खात्री करून घ्यावी. ज्या व्यक्तीला वारंवार जंतुसंसर्ग होतो व वेदना होतात ती व्यक्ती पीडित मानली जाते. वाहकाला या आजाराचा त्रास होत नाही. या आजारातील वाहक पूर्णपणे निरोगी असतात; परंतु या वाहकाने दुसऱ्या वाहकाशी किंवा सिकलसेल पीडिताशी लग्न केले, तर पुढच्या पिढीत या आजाराचा प्रसार होतो. लग्न झालेच असेल तर अपत्य जन्माच्या आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भजलचिकित्सा करून उपचार घेतले जाऊ शकतात.
ते म्हणाले, आईवडील दोघेही पीडित असतील तर होणारे अपत्य पीडित होते. आई पीडित व वडील वाहक असतील, तर अपत्य ५० टक्के पीडित होते. आई पीडित व वडील निरोगी किंवा वडील पीडित व आई निरोगी असेल तर अपत्य १०० टक्के वाहक होतात. पीडित व्यक्तीने निरोगी व्यक्तीशी लग्न करावे. स्त्री-पुरुष दोघेही वाहक असतील तर एकमेकांशी लग्न करू नये, असा सल्ला डॉक्टर देतात. या आजाराची तीव्रता बघून या आजाराच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विशेष मोहीम शासनाने हाती घेतली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhandara district has 1963 sickle cell disease patients