भाजप व काँॅग्रेसचे उमेदवार प्रचारालाही लागण्याच्या पाश्र्वभूमीवर तिसरी आघाडी, आप व अन्य राजकीय गोटात दिसून येणारी शांतता अनाकलनीय ठरली आहे. काही अपवाद वगळता वर्धा लोकसभा मतदारसंघात नेहमीच दुरंगी सामना रंगला आहे. यावेळी काँॅग्रेसचे सागर मेघे व भाजपचे रामदास तडस यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे उमटत आहेत.
माकप, तिसरी आघाडी, आप व अन्य आघाडय़ांतर्फे  मात्र अद्याप उमेदवारी पुढे आलेली नाही. यापूर्वी माकपचे रामचंद्र घंगारे हे तिसऱ्या आघाडीतर्फे खासदार राहून चुकले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर दत्ता मेघे हे रिंगणात आले असताना त्यांची प्रभा राव व सुरेश वाघमारे यांची तिहेरी लढत चांगलीच रंगली होती. १९९८ मधे जनता दलाचे डॉ. पांडुरंग ढोले, शेतकरी संघटनेच्या सरोज काशीकर, गतवेळी बसपचे विपिन कंगाले यांनी तिसऱ्या जागेसाठी जोरदार लढत दिली होती. माकप, काँग्रेस व भाजप अशी तिहेरी लढतीचे चित्र १९९९ नंतर संपुष्टात आले.
आता थेट दुहेरी सामनाच राजकीय धृवीकरण झाल्याने घडू लागला आहे. यावेळी मेघे-तडस सामना रंगण्याची पूर्वीपासूनच चर्चा सुरू झाली होती. घंगारेंच्या पश्चात तिसऱ्या आघाडीचे स्थानच संपुष्टात आल्यानंतर बहुतांश माकप, भाकप, जद, शेतकरी संघटना असा राजकीय पैलू लोकसभा निवडणुकीतून नाहीसा झाला होता. गतवेळी दत्ता मेघेंच्या सोबतच तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांची पंगत बसली होती. यावेळी मेघेपुत्र असून निवडणूक रथाचे सारथ्य खुद्द दत्ता मेघे सांभाळत आहे. महायुतीचे रामदास तडस यांच्या उमेदवारीने लढतीला रंग आला आहे. या पाश्र्वभूमीवर तिसरा कोण? हा प्रष्टद्धr(२२४)्ना उत्सुकतेचा ठरला आहे.
शेतकरी संघटना व आपची युती झाली आहे. मात्र युतीचा उमेदवार अद्याप पुढे आलेला नाही. आप याठिकाणी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. बसपचा उमेदवार प्रत्येकवेळी रिंगणात असतो. लक्षणीय मतेही घेऊन जातो. पण बसपतर्फे ही किमान इच्छुकांचीही नावे पुढे आलेली नाही. दोन दिवसापूर्वीच जनता दलाचे नेते प्रा. शिवाजी ईथापे यांच्या घरी माकप, शेतकरी संघटना, मराठा सेवा संघ, शिवराज्य पार्टी, पीपल्स रिपब्लीकन पार्टी, ग्राम किसान पंचायत, अंधश्रध्दा निर्मूलन समिती व अन्य पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. वर्धा मतदारसंघात धनशक्ती विरुध्द जातीयवादी शक्तीची लढत होणार असल्याबद्दल या नेत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सर्व सामान्य मतदारांना तिसरा चांगल्या उमेदवाराचा पर्याय देण्याचा विचार बोलून दाखविण्यात आला.
याच बैठकीत आप पक्षासोबत समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला. आपने योग्य उमेदवार दिल्यास त्या उमेदवाराच्या पाठीशी तिसऱ्या आघाडीची ताकद उभे करण्याचेही निश्चित झाले. सध्या प्राथमिक पातळीवरच चर्चा झाल्याने प्रा. ईथापे यांनी मान्य केले. मूळात या सगळया तिसऱ्या कोनाला मेघेंचा धसका असल्याचे लपून नाही. तिसऱ्या आघाडीने उमेदवार उभा करायचा व पुढे उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्यांपैकी काही मेघेंच्या गाडीत बसल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. मेघे वलयातून गत दहा-पंधरा वर्षांत अनेक कॉग्रेस-भाजपेतर नेते मंडळी राजकीय अस्तित्वच गमावून बसली आहे. यावेळी मेघे घराण्याच्या राजकीय वारसदाराचाच प्रष्टद्धr(२२४)्ना असल्याने व त्याविरोधात त्यांचाच शिष्य लढतीत असल्याने इतरांचे स्थान काय राहणार, याकडे मतदारांचेही लक्ष लागले आहे. जिल्ह्य़ात आपची स्थापना झाली, पण हा पक्ष अंकुरावस्थेतच असून छाप पाडावी असा नेता किंवा उमेदवार या पक्षाकडे नसल्याचे दिसून येते. विजय जावंधिया यांची मनधरणी आपच्या योगेंद्र यादव व अन्य नेत्यांनी केली. पण आपने जावंधियाविरोधी शेतकरी संघटनेची युती केल्यानेच जावंधियांचे पाउल मागे पडल्याची चर्चा आहे.
यापूर्वीच्या प्रत्येक लोकसभा निवडणूकीत तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराची नेहमीच चर्चा राहली. त्या पाश्र्वभूमीवर यावेळची शांतता अनाकलनीय ठरली आहे. तिसऱ्या आघाडीचे कर्तेधर्ते यशवंत झाडे, शिवाजी ईथापे, मनोहर पंचारिया व अन्य मंडळींचा मेघे कुटुंबाशी नेहमीच सलोखा राहिल्याचे वर्धेकरांनी पाहिले आहे. हा सलोखा या निवडणुकीतही दिसणार काय?  या प्रष्टद्धr(२२४)्नााचे उत्तर पुढेच अपेक्षित आहे. रिपाइं व भाजपचा एक गट रामदास तडसांच्या उमेदवारीला डमी संबोधत स्वतंत्रपणे तयारीला लागला आहे. त्यामुळे या पैलूनेही नवा उमेदवार येण्याची शक्यता आहे. पण शक्यतेलाही ठिसूळपणा आहे. मेघे-तडस यांच्या उमेदवारीमुळे तर तिसऱ्या बलाढय़ उमेदवारीची शक्यता धूसर झाली नाही ना? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जातो.