कंत्राटी काम दिले नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गोंधळ घालून कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ करून त्याची गाडी रोखण्याचे कृत्य सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक विटकर यांनी केले. या टगेगिरीबद्दल त्यांच्या विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता अरुण भगवान शिंदे यांनी या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी साडेबाराच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १च्या कार्यालयातशिंदे हे कार्यकारी अभियंतापदावर कार्यरत आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास शिंदे हे कार्यालयात कामकाज पाहात असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विटकर हे दरवाजा ढकलून थेटशिंदे यांच्या दालनात आले. मला द्यायच्या कामाचे काय झाले, असा जबाब विचारून त्यांनी शिंदे यांना अश्लील शिवीगाळ करून गोंधळ घातला. त्यामुळे शिंदे हे वैतागून कार्यालयाबाहेर पडून आपल्या शासकीय वाहनात बसत असताना विटकर यांनी त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिंदे यांनी थेट सदर बझार पोलीस ठाणे गाठून विटकर यांच्या विरुद्ध फिर्याद नोंदविली. अश्लील शिवीगाळ, गोंधळ, शासकीय मोटारीचा दरवाजा ओढाओढी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी विटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादी युवक अध्यक्षाची बांधकाम खात्यात ‘टगेगिरी’
कंत्राटी काम दिले नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गोंधळ घालून कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ करून त्याची गाडी रोखण्याचे कृत्य सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक विटकर यांनी केले.
First published on: 26-10-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullying of ncp youth chairman in construction