दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी जवाहिऱ्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी झुंबड उडू लागली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठय़ा जवाहिऱ्यांनी थेट सोने खरेदीवर तितक्याच वजनाची चांदी फुकट देण्याची योजना आखली आहे. ठाणे आणि डोंबिवली परिसरात कार्यरत असलेले चिंतामणी ज्वेलर्सच्या वतीने सोने खरेदीवर तीतक्याच वजनाची चांदी फुकट देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये तीन हजारांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना कार, परदेशी सहल आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. २६ ऑक्टोबपर्यंत ही योजना असून ग्राहकांनी खरेदी केलेल्या सोन्याच्या वजना इतकी चांदी त्यांना मोफत दिली जाणार आहे.
ठाण्यात ७५ वर्षांहून अधिक काळ सुबक कलाकुसरीचे दागिन्यांच्या मांडणीसाठी लागू बंधूचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्टिफाइड डायमंडचे दागिने किंवा शुद्ध सोन्याचे पारंपरिक दागिने लागू बंधू मध्ये उपलब्ध होतात.