scorecardresearch

Premium

स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन

रोख अनुदानाचा पुनर्विचार करावा आणि देशातील १०० टक्के जनतेला रास्त दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या चारही तालुक्यांत तसेच नंदुरबार जिल्ह्यातही स्वस्त धान्य दुकानदार, शिधापत्रिकाधारक, हमाल आणि रॉकेल वितरकांनी

स्वस्त धान्य दुकानदारांचे आंदोलन

रोख अनुदानाचा पुनर्विचार करावा आणि देशातील १०० टक्के जनतेला रास्त दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या चारही तालुक्यांत तसेच नंदुरबार जिल्ह्यातही स्वस्त धान्य दुकानदार, शिधापत्रिकाधारक, हमाल आणि रॉकेल वितरकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ११ ते १२ वाजेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्ग, नागपूर-सूरत तसेच अन्य मार्गावरील वाहतूक थांबवून शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अन्नसुरक्षा विधेयकातील काही मुद्दे देशातील शिधा वितरण प्रणालीवर विसंबून असलेल्या लाखो कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकतील, असे मत अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने व्यक्त केले आहे. स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील हमाल व अन्य घटक तसेच शिधापत्रिकाधारकही या विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष महेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली धुळे, शिरपूर व शिंदखेडा तसेच अन्य ठिकाणी आंदोलन झाले. शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दोंडाईचा रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-05-2013 at 08:59 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×