रातराणीचा प्रवास स्वस्त

एरवी केवळ भाववाढीची घोषणा करणा-या एसटी महामंडळाने रातराणीचे भाडे कमी करून मकरसंक्रांतीची प्रवाशांना सुखद भेट दिली आहे. संक्रांतपूर्व मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणीही करण्यात आली.

एरवी केवळ भाववाढीची घोषणा करणा-या एसटी महामंडळाने रातराणीचे भाडे कमी करून मकरसंक्रांतीची प्रवाशांना सुखद भेट दिली आहे. संक्रांतपूर्व मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. नव्या दरानुसार नगरहून मुंबईचे भाडे सुमारे २० टक्के म्हणजे तब्बल ४७ रुपयांनी कमी झाले आहे.
रात्रसेवेचा प्रवासी भाडेदर कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. रातराणी बससेवेचे भाडेही ५ रु. ९५ पैसे प्रतिटप्पा करण्यात आले आहे. नगरच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून त्याची अंमलबजावणी आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी पत्रकाद्वारे दिली.
नगरच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून महत्त्वाच्या ठिकाणी रात्रफेरीचे सुधारित प्रवासी भाडे पुढीलप्रमाणे (कंसात पूर्वीचे भाडे) : नगर-सोलापूर २३२ रु. (२७१ रु.), नगर-पंढरपूर १९६ रु. (२२९ रु.), नगर-नाशिक १७३ रु. (२०२ रु.), नगर-धुळे २२६ रु. (२६४ रु.), नगर-मुंबई २८० रु. (३२७ रु.), नगर-कोल्हापूर ३५१ रु. (४१० रु.), शिर्डी-दादर २७४ रु. (३२० रु.).

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cheap travel of ratrani