प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित संविधानदिनाच्या कार्यक्रमात प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संविधान उद्देशित्वाचे प्रकाशन झाले. त्याची प्रतिमा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट देण्यात आली.
प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने अशा प्रतिमांचे राज्यभर वितरण व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.
मंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री डी. पी. सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे, केदार पाटील आदी उपस्थित होते.