स्वस्त धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रकरणात अखेर तहसीलदार नीलेश काळे यांना काल, मंगळवारी अटक करण्यात आली. काळे यांना उद्या, पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिमूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य लाभार्थ्यांना देण्याऐवजी ते खुल्या बाजारात विकले जाते होते. यात मोठय़ा प्रमाणात धान्याचा अपहार झाला होता. या प्रकरणाची २०१३ मध्ये तक्रार झाल्यानंतर चिमुरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करण्यात आली. त्यात दहा पंधरा दुकानदारांवर व खासगी व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात फिर्यादी म्हणून स्वत: तहसीलदार नीलेश काळे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण स्थानिक गुन्ह शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात होते. दरम्यान, आज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर तिक्कस, एपीआय तुकलवार व त्यांच्या पथकाने तहसील कार्यालयातच काळे यांना अटक केली. चिमूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काळे यांच्या अटकेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदार व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली तेव्हापासूनच तहसीदारांची भूमिका संशयास्पद होती. बोगस शिधापत्रिकेवर मागणीपेक्षा जास्त धान्य देऊन काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. तक्रारीसुद्धा झाल्या, पोलिसांनी एक ट्रक पकडला आणि हे प्रकरण उजेडात आले.

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
2 accused arrested for cheating in the name of buying and selling transactions in the speculation market navi Mumbai
नवी मुंबई: सट्टा बाजारात खरेदी विक्री व्यवहाराच्या नावाखाली फसवणूक करणारे २ आरोपी अटक