सिडको शहर व्यवस्थापनासाठी आता नागरिकांची सल्लागार समिती

सिडकोचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकभिमुख व्हावा यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पारदर्शक आराखडय़ानंतर सिडकोसाठी नागरिकांचा समावेश असणारी शहर व्यवस्थापन सल्लागार समिती स्थापन केली आहे.

सिडकोचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकभिमुख व्हावा यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पारदर्शक आराखडय़ानंतर सिडकोसाठी नागरिकांचा समावेश असणारी शहर व्यवस्थापन सल्लागार समिती स्थापन केली आहे. यात शहरातील वास्तुविशारद, इंजिनिअर, डॉक्टर, बिल्डर, वकील नगररचनाकार, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे.
 भाटिया यांनी सिडको सुधारण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली असून दलाल, बिल्डरांना सिडको बंदी केल्यानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे परिपत्रक जाहीर केले आहे, मात्र हा ड्रेसकोड सर्व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेला नाही. या नंतर शहर उभारणीत थेट शहरातील निष्णांत, तज्ज्ञ लोकांचा समावेश करुन घेण्यासाठी त्यांनी नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. त्यात शहरातील आरटीआय सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर, सिडकोचे माजी जेष्ठ अभियंता प्रभाकर अंबिके, कामगार नेते सुरेश ठाकूर, शिक्षणतज्ञ आनंद कट्टी, अर्थतज्ञ आर. भट्टाचार्य, विकासक संदीप संपत, वास्तविशारद  शोयब तालीब, माजी सैनिक कर्नल अमिताभ, डॉक्टर सुहार हळदीपूरकर, प्रकल्पग्रस्त नेते आणि वकील पी. सी. पाटील. नगररचनाकार दिलीप शेकदार, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रा. वृषाली मगदूम, सिडको कामगार संघटनेचे निलेश तांडेल, जेष्ठ अभियंता सी. एस. संघवी या बैठकीला उपस्थित होते.
स्टेक होल्डर नावाने स्थापन करण्यात आलेल्या या समितीत सध्या १७ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीला १४ जेष्ठ तज्ज्ञ नागरिक उपस्थित होते. सिडकोचा थिंक टॅक म्हणून काम करणाऱ्या या सदस्यांनी शहरातील सर्व समस्यांचा मागोवा घ्यावा असे अभिप्रेत आहे. त्याची दर दोन महिन्याने बैठक होणार असून त्यात समस्या आणि त्यावरील उपाय यांची चर्चा होणार आहे.
सिडकोचा अर्धा भाग नवी मुंबई पालिकाच्या अखात्यारित येत असला तरी काही प्रश्न अद्याप सिडकोशी निगडीत आहेत.  शहरात फार मोठय़ा प्रमाणात वापरातील बदल झाल्याने अनेकांनी मोक्यांच्या जागांवर ‘निचे दुकान आणि उपर मकान’ असे बांधकाम केले आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि संबधित इतर समस्या निर्माण झाल्याची बाब संदीप ठाकूर यांनी निर्दशनास आणून दिली. शैक्षणिक संस्थांना एकाच नोड मध्ये अनेक भूखंड दिल्याने आज त्यांच्या टोलेजंग इमारती उभ्या रहात असून तेथे शिक्षणासाठी येणारी विद्यार्थी हे शहराबाहेरुन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहरावर ताण पडत आहे. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकर सुटत नसल्याने सिडकोला नंतर खूप मोठी रक्कम अदा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साडेबारा टक्के योजना लवकरात लवकर संपुष्टात आणावी असे स्पष्ट केले. नवीन गृहनिर्माण प्रकल्प सिडकोने न राबविल्याने घरांची समस्या निर्माण झाल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले. या थिंक टॅक कडून गरजेपोटी बांधलेली घरे, फेरावाले, भ्रष्टाचार, कामाची गुणवत्ता, सिडकोच्या पुढील वीस वर्षांतील योजना, आप्तकालीन सहकार्य याबाबत वेळोवेळी चर्चा केली जाणार आहे.

citizen suggestion committee for cidco city management

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Citizen suggestion committee for cidco city management

ताज्या बातम्या