आंदोलनामुळे झालेले नुकसान वसूल करण्याची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने चौकशी करून जबाबदार असणाऱ्याकडून ते वसूल करावे.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने चौकशी करून जबाबदार असणाऱ्याकडून ते वसूल करावे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांनी रविवारी पत्रकार बठकीत दिली.
    जनतेला वेठीस धरून पश्चिम महाराष्ट्राचे कामकाज ठप्प करणाऱ्या संघटनेने अचानक आंदोलन स्थगित का केले, असा प्रश्न उपस्थित करून उसाला प्रतिटन ३ हजार रुपये देण्याची रास्ता मागणी होती. यासाठी मनसेचा लढा चालूच राहील असे सांगून खाडे यांनी संशयास्पद आंदोलन करणाऱ्या संघटनेची मान्यता रद्द करावी. या व अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Demand to recover damages claim due to movement

Next Story
तक्रार केली म्हणून विभागीय चौकशीचा ससेमिरा
ताज्या बातम्या