व्यायामासाठी निघालेल्या मुलाचा मालमोटारीने ठोकरल्याने मृत्यू

व्यायाम करण्यासाठी सकाळी फिरायला गेलेल्या एका १४ वर्षांच्या किशोरवयीन मुलाचा भरधाव मालमोटारीने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला.

व्यायाम करण्यासाठी सकाळी फिरायला गेलेल्या एका १४ वर्षांच्या किशोरवयीन मुलाचा भरधाव मालमोटारीने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला. शहरातील होटगी रस्त्यावरील विमनतळाजवळ गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
नागनाथ प्रकाश वाघमारे (रा. हरळय्यानगर, मजरेवाडी) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. नागनाथ यास व्यायाम करण्याचा छंद होता. तो नियमितपणे दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी फिरायला जात असे. नेहमीप्रमाणे तो सकाळी घराबाहेर फिरायला निघाला असताना विमानतळाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंटवाहू मालमोटारीची त्यास धडक बसली. यात तो जागीच मरण पावला. मालमोटारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपुरात अपघात
पंढरपूर शहरात पद्मावती बागेजवळ मोटारसायकलस्वाराला एसटी बसने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात अजय पांडुरंग पवार (वय २०, रा. ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, पंढरपूर) या मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एसटीबसचालक पांडुरंग भीमराव रगडे (रा. कुर्डूवाडी) यास पंढरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Died in collision of mortar