देशातील अनेक शहरांपेक्षा हे शहर सुंदर आहे. नियोजनबद्ध आहे मात्र येथील लोकप्रतिनिधींकडे शहराचा कल्पनाविस्तार करणारे व्हिजन नाही. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज यांच्यापलीकडे येथील नगरसेवक जाताना कधी दिसले नाहीत. शहराचे बिग पिक्चर पाहिले गेलेले नाही. त्यामुळे सीबीडी येथे असलेले पाच हजार एकर जागेवरील नेचर पार्क कोणाला माहीत नाही. रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या नेचर पार्कसाठी एखादा नगरसेवक भांडताना किंवा पालिका काही योजना आखत असल्याचे दिसून येत नाही. ते जे एक व्यापक व्हिजन लागते ते दिसून येत नाही. त्याची खंत वाटते. अखेर आम्हीच ही बाब सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी वीस कोटी रुपये खर्च करून हे पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराच्या कुशीत अशी अनेक ठिकाणे आहेत पण ती विकसित करण्याची स्वप्ने कोणी पाहताना दिसत नाही. आणि कोणी याची वाच्यता करीत असेल तर ती पूर्ण करण्याचा दृढनिश्चय दिसून येत नाही. सर्वच गोष्टी सर्वाना कळतात असे नाही पण जे आपल्याला कळत नाही, ते इतरांकडून समजवून घेऊन जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम नगरसेवक करू शकतात, पण ही तळमळ एकाही नगरसेवकात दिसून आली नाही. शहरात सरकारने सिडको निर्मित इमारतीसाठी अडीच व गावांसाठी चार एफएसआय मंजूर केला आहे. त्यामुळे शहर आता नवीन कात टाकणार आहे. लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे हे एफएसआय म्हणजे काय आहे, त्याचा आपल्या नागरिकांना कसा उपयोग होईल हे उमजून घेण्यासाठी एक नगरसेवक वगळता इतर कोणताही लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाही. केवळ आपला प्रभाग आणि तेथील नागरी कामे एवढय़ापुरते मर्यादित असणारे हे नगरसेवक शहराचा व्यापक विचार करणार कधी, असा प्रश्न पडतो. त्यामुळे सुशिक्षित, एखाद्या विषयाचा चांगला अभ्यास, शहर सुंदर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसवेकांना जनतेने सभागृहात स्थान दिले पाहिजे.
– दिनकर सामंत, शहर नियोजनकार

china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?