पाणी वाचवा, महिला अत्याचार, िड्रक अ‍ॅण्ड ड्राइव्ह यांसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर जनजागृती करण्यासाठी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती पणाला लावणाऱ्या ‘डूडल सोशल अ‍ॅड फेस्टिव्हल २०१४’ चे आयोजन ‘मंथन आर्ट स्कूल’ या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धा, प्रदर्शन व कार्यशाळा असणारा हा देशातील पहिलाच सोशल अ‍ॅड फेस्टिव्हल आहे. हा महोत्सव मुंबईत २२ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पु. ल. देशपांडे अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिरात, तर ६ ते ९ मार्च दरम्यान पुण्यातील बालगंधर्व नाटय़गृहात होईल. राष्ट्रीय पातळीवरील या महोत्सवास व्यावसायिक, कलाकार व विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेश विनामूल्य आहे.
डूडल महोत्सवाचा या वर्षी विस्तार वाढविण्यात आला आहे. विशेषत: िपट्र अ‍ॅड व अ‍ॅड फिल्म्स अशा दोन वर्गवारीत उमेदवारांनी आपल्या कलाकृती पाठवायच्या आहेत. प्रत्येक वर्गवारीतील ५० जाहिरातींची निवड या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी अ‍ॅड गुरूंकडून केली जाईल. निवडलेल्या कलाकृती सर्वसामान्यांसाठी प्रदर्शनात मांडल्या जातील. व्यावसायिक व विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या या महोत्सवामध्ये जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिकांची कल्पकता विद्यार्थ्यांना अनुभवता येईल तर येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांतील नवनिर्मितीची क्षमता व्यावसायिकांपर्यंत पोहोचेल, असे महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
या महोत्सवात क्रिएटिव्हिटी इन अ‍ॅडव्‍‌र्हटायझिंग (जाहिरातीतील कल्पकता), क्रिएटिव्ह कॉपीरायटिंग, ब्रँडिंग, अ‍ॅड फिल्म्स, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, इनोव्हेटिव्ह मीडिया आणि नवोदितांसाठी करिअरची संधी, अशा विविध विषयांवर संजय खरे, रेमण्ड पटेल, अमोल गोळे, राजेश कुलकर्णी, सौरभ चांदेरकर व सौरभ करंदीकर यांसारख्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभेल. महोत्सवाचे खास वैशिष्टय़े म्हणजे विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कास्य स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच गोवा येथे होणाऱ्या ‘गोवा फेस्ट’ या भारतातील सर्वात मोठय़ा जाहिरात महोत्सवात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मंथन आर्ट स्कूल संस्थेतर्फे उपलब्ध करण्यात येईल. या महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०१४ असून अधिक माहितीसाठी ८६५५०९७७१६/१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याशिवाय www.doodleadfest.com   या संकेतस्थळाद्वारेही संपर्क साधता येईल. जाहिरात हे कल्पकतेचे क्षेत्र आहे. पण ही कल्पकता जर समाजासाठी वापरता आली तर त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. कलाकारांनी सामाजिक प्रश्नांची व्यापकता व्याकूळतेने जाणावी, त्यांच्या कलाकृतीतून समाजाला एक संदेश मिळावा, यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंथन आर्ट स्कूल संस्थेचे संस्थापक प्रा. शशिकांत गवळी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doodle social add festival
First published on: 01-12-2013 at 11:52 IST