जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे अलीकडेच वितरण करण्यात आले. वाडा तालुक्यातील खानिवली प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप इंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ठाणे येथील वर्तक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ग्रामीण भागातील उत्कृष्ट कामकाज असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व जव्हार येथील कुटीर रुग्णालयास भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गायकवाड, उपाध्यक्ष इरफान भुरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, आरोग्य समितीचे सभापती राजेंद्र पागधरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2013 रोजी प्रकाशित
वाडय़ातील खानिवली आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे अलीकडेच वितरण करण्यात आले.
First published on: 27-04-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr anandibai joshi award to khaniwai health centre