वणी येथील श्री जैताई देवस्थानचा यावर्षीचा प्रतिष्ठाप्राप्त जैताई मातृगौरव पुरस्कार हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे शिल्पकार डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे जैताई देवस्थान समितीने जाहीर केले आहे.
श्रमर्षी बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष व १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित होत असलेल्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या जीवनकार्यावर आधारित डॉ. समृद्धी पोरे दिग्दिर्शित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे, दि रिअल हीरो’ हा चित्रपट या पाश्र्वभूमीवर या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. हा पुरस्कार डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना सोमवारी, २९ सप्टेंबरला जैताई मंदिराच्या प्रांगणात रात्री ८ ते १० पर्यंत पार पडणाऱ्या एका शानदार समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी चित्रपट दिग्दर्शिका अ‍ॅड. समृद्धी पोरे स्वत: उपस्थित राहणार आहेत. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून यापूर्वी हा पुरस्कार साधनाताई आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉ. राणी बंग, डॉ. स्मिता कोल्हे, अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांना देण्यात आला आहे, असे एका पत्रकात देवस्थानने म्हटले आहे.
हेमलकसा व भामरागड परिसरातील माडिया गोंड या अतिमागास आदिवासी जमातीला मुख्य प्रवाहात आणावे, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, हे बाबा आमटे यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी (१९७३ मध्ये) डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे या नवविवाहित दांपत्याने ‘लोकबिरादरी प्रकल्प’ सुरू केला. आपले प्राण पणाला लावून त्यांनी चार दशकांच्या तपश्चर्येनंतर बाबांचे स्वप्न साकार केले तेव्हा जगातील साऱ्या मोठमोठय़ा सन्मानांनी त्यांच्या पावलांना स्वत:हून स्पर्श केला. असे हे जगन्मान्य जोडपे पाहण्याची व ऐकण्याची संधी वणी परिसरातील नागरिकांना २९ सप्टेंबर रोजी प्राप्त होत आहे.

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान