संपूर्ण राज्यात आपल्या आर्थिक व्यवस्थापनाचे जाळे निर्माण करून ठेवीदारांच्या व गुंतवणूकदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या अकोला अर्बन को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र उपाख्य बाबासाहेब पाठक यांची, तर उपाध्यक्षपदी सनदी लेखापाल संजय कोटक यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
बाबासाहेब पाठक हे ज्येष्ठ संचालक असून ते यापूर्वी उपाध्यक्ष होते. आपल्या कार्यकाळात या बँकेचा सर्वागीण विकास करण्याच्या, तसेच ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सुविधा देण्याच्या योजना अमलात आणू, असा विश्वास या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बुलढाणा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे अधिकारी नीलकंठ करे यांनी काम पाहिले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेशचंद्र हुशे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल.एम. दास व इतर अधिकारी उपस्थित होते.