महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘इको फ्रेंण्डली घरचा गणपती सजावट’ स्पर्धेतील विदर्भातील विजेत्यांना येत्या शुक्रवारी, १८ जानेवारीला पारितोषिक वितरण केले जाणार आहे. ‘लोकसत्ता’ च्या ग्रेट नाग रोडवरील कार्यालयात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप-विभागीय अधिकारी एस.एस. गाढवे भूषविणार आहेत. यावेळी ‘लोकसत्ता’चे विदर्भ ब्युरो चीफ विक्रम हरकरे, महाव्यवस्थापक (वितरण-पश्चिम) मंगेश ठाकूर, उपमहाव्यवस्थापक (स्पेस मार्केटिंग) बद्रुद्दीन ख्वाजा तसेच मुख्य वितरण व्यवस्थापक वीरेन्द्र रानडे व्यासपीठावर उपस्थित राहतील.
इको फ्रेंण्डली घरगुती गणेश सजावट स्पर्धेत एकूण दहा विजेत्यांची निवड करण्यात आली असून, यात अजय कारवा (अमरावती), मेघा चांदे (चंद्रपूर) यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे पारितोषिक पटकावले आहे. तर अजित गर्गे (खामगाव), अभिषेक शंखपाळे (नागपूर), रेणुका भाले (अकोला) यांना प्रोत्साहनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी धीरन मेश्राम (नागपूर), प्रणव वायकुले (नागपूर), सीमा विनोद (खामगाव) आणि ऋग्वेद पारवे (नागपूर) यांना पारितोषिक दिले जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान घेण्यात येणाऱ्या इको फ्रेण्डली गणेश सजावट स्पर्धेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद लाभत असून, संपूर्ण महाराष्ट्रात ही स्पर्धा लोकप्रिय झाली आहे.