बार्शीजवळ वृद्धाचा शेकोटीत भाजून मृत्यू

सोलापूर जिल्हय़ात थंडीचा कडाका अधूनमधून वाढत असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणाऱ्या एका वृद्धाचा शेकोटीच्या आगीत भाजून मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील राळेरास येथे ही घटना घडली.

सोलापूर जिल्हय़ात थंडीचा कडाका अधूनमधून वाढत असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणाऱ्या एका वृद्धाचा शेकोटीच्या आगीत भाजून मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील राळेरास येथे ही घटना घडली.
चंद्रभान भाऊ कदम (वय ६०) असे मृताचे नाव आहे. चंद्रभान यांनी गावात आपल्या घरासमोर पहाटे पाचच्या सुमारास थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटविली. शेकोटीसमोर बसून ऊब घेताना अचानकपणे शेकोटीतील आगीत त्यांचे कपडे पेटले आणि काही क्षणातच ते स्वत: गंभीर भाजले. त्यांना तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अखेर त्यांचा मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eged died in fire near barshi