लोकसभेसाठी विविध राजकीय पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसह धडाक्यात प्रचार सुरू आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणाला उमेदवारी निश्चित झाल्याने काहींना प्रचारास केवळ फारतर अठरा दिवसच मिळणार आहेत. काही उमेदवारांनी त्याआधीच प्रचार सुरू केल्याने त्यांना भरपूर वेळ मिळाला. तरीदेखील निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती झाल्यानंतर प्रचारास खऱ्या अर्थाने रंग चढला आहे.
बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. मोहन गायकवाड (पाटील) यांच्या प्रचारार्थ पूर्व, पश्चिम, दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपुरात कार्यकर्त्यांनी दुचाकीवर मिरवणूक काढली. खुल्या जीप मधून डॉ. गायकवाड पाटील जनतेला अभिवादन करीत होते. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, अविनाश बडगे, बीव्हीएफचे कमांडर अशोक डोंगरे, जिल्हा कार्यालय सचिव आनंद सोमकुवर, मिलिंद बनसोड, मिडीया प्रभारी उत्तम शेवडे, नगरसेवक किशोर गजभिये व सागर लोखंडे, तेली भाईचारा समितीचे संयोजक राजेंद्र पडोळे, यांच्यासह सहदेव पिल्लेवान, संजय सोमकुवर, महिनाल सांगोळे, सुरेखा डोंगरे, रेवती गायकवाड, बालचंद जगताप, संजय शिंदे, ओमप्रकाश शेवाडे, यादव भगत, शंकर थुल, अजय सावरकर, अमोल कोल्हे, प्रशांत चौधरी, सचिन फुकट, अरुण हनवते, प्रफुल मेश्राम, सोनू गौरखेडे, राजन नितनवरे, उमेश वरघट, मनोज मडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाली होते. चंदननगरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. पूर्व नागपुरात लकडगंज, मध्य नागपुरातील कर्नलबाग, दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील सुभाष नगर आदी ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा झाल्या. माजी महापौर पांडुरंग हिवरकर व मिलिंद बनसोड, नरेश वासनिक, उत्तम शेवडे, अ‍ॅड. ध्रुव मेश्राम, छाया कुरडकर, आनंद सोमकुवर, नगरसेवक सागर लोखंडे, अशोक ढोणे, दुर्गा पुडके, संजय कांबळे आदींची या सभांमध्ये भाषणे झाली.
महायुती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार डॉ. दीपक सावंत तसेच नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. नितीन गडकरी यांच्या विजयात शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा राहील, अशी ग्वाही आमदार डॉ. सावंत यांनी दिली. माजी खासदार प्रकाश जाधव, सुधाकर देशमुख, आशिष जयस्वाल हे आमदार, महापौर अनिल सोले, माजी महापौर राजेश तांबे, प्रा. संजय भेंडे, रिपाइंचे शहर प्रमुख राजू बहादुरे, शिवसेनेचे शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, रमेश बक्षी यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यां मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उत्तर नागपुरातील बुद्धनगर परिसरात जाहीर सभा झाली. नितीन गडकरी यांच्यासह नवनीतसिंग तुली, महेंद्र धनविजय, मनजिंदरसिंग सिद्धू, बलजितसिंग रेणू, मारुती लक्षणे, गिरीश व्यास, प्रभाकर येवले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. विजयी झाल्यावर गोरगरिबांच्या कल्याणासाठी हितपूर्वक कार्य करण्याची, बेरोजगारी दूर करण्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली.
आघाडी आघाडीचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य व दक्षिण-पश्चिम मतदारसंघामध्ये पदयात्रा काढल्या. वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री अनीस अहमद, सतीश चतुर्वेदी, हाजी शेख हुसेन, कमलेश समर्थ, बाबुराव झाडे, प्रभावती ओझा, विठ्ठल कोंबाडे, गजराज हटेवार, तानाजी वनवे, सचिन दुरुगकर, नगरसेविका सुजाता कोंबाडे, नयना झाडे, निमिषा शिर्के, सरस्वती सलामे, प्रगती पाटील, हरिश ग्वालबंसी, नितीन ग्वालबंसी, संजय महाकाळकर, राजू नागुलवार, जयंत लुटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पश्चिम नागपुरातील हजारी पहाड, उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती चौक, पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी चौक, मोठा ताजबाग, जुना दसरा रोड व अनेक भागात जाहीर सभा झाल्या. काटोल मार्गावरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या हस्ते झाले. गंगाप्रसाद ग्वालबंसी, विशाल मुत्तेमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विशाल मुत्तेमवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरी समाज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांची सभा झाली.
आम आदमी पक्षाच्या उमेदवार अंजली दमानिया यांनी मानकापूर, नाईक तलाव, पूर्व व दक्षिण नागपुरात ‘रोड शो’ केला. त्यात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पारडी येथे त्यांची सभा झाली. आम आदमी पक्षाच्या उद्दिष्टांची त्यांनी माहिती देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.