जागतिक परिचारिका दिनानिमित्त येथे रेडक्रॉस कार्यालयात मेजर पी. एम. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत परिचारिकांचा गौरव करण्यात आला.
रुग्णाला पूर्णपणे बरे करण्याचे श्रेय जसे डॉक्टरला जाते तसेच किंबहुना, त्यापेक्षाही जास्त परिचारिकांना द्यावयास हवे, असे भगत यांनी सांगितले. डॉ. प्रशांत भुतडा आणि डॉ. प्रतिभा औंधकर यांचीही उपस्थिती यावेळी होती. ‘मातृदिन’ एकच दिवस का साजरा करावा, तो तर रोजच असावयास हवा. वर्षांचे ३६५ दिवस आपण परिचारिकांच्या कार्याची आठवण ठेवल्यास आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार डॉ. औंधकर यांनी व्यक्त केले. डॉ. भुतडा यांनी परिचारिकांनी पाळावयाच्या आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केले.