समुद्र सपाटीपासून खोल व खाडीच्या परिसरात उरण तालुका वसलेला असून समुद्राच्या भरती ओहटीच्या नियमानुसार या परिसरात पारंपारिक पद्धतीचे नसíगक नाले तयार करण्यात आलेले होते, या नाल्यावरील खारफुटीच्या संरक्षणामुळे उरण तालुक्यातील पाण्याचा नगर्सकि निचरा होत होता. मात्र, सिडको तसेच खासगी उद्योजक आणि जेएनपीटी बंदराच्या विकासाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात नसíगक नाले व खारफुटीवरच मातीचा भराव सुरू केल्याने उरण तालुक्यालाच पुराचा धोका निर्माण झाला आहे.
जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त गावांतही या मातीच्या भरावामुळे समुद्राचे पाणी शिरू लागले आहे. भरतीच्या पाण्यामुळे भेंडखळ, नवघर, पागोटे, कुंडेगाव, बोकडविरा, फुंडे, जसखार, सोनारी, करळ सावरखार या गावांत पाणी शिरलेले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात गावांना पुराला सामोरे जावे लागण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
तीन वर्षांपूर्वीच समुद्राच्या भरतीचे पाणी गावात शिरल्याने कुंडेगावातील एका अडीच वर्षीय बालकाचा भरतीच्या पाण्यात बुडून मृत्य झाला होता. उरण परिसरातील जेएनपीटी बंदरा लगत असणाऱ्या खाडीत नव्या बंदराच्या उभारणीसाठी तसेच इतर विकास कामासाठी सिडकोनेही मातीचा भराव टाकून येथील समुद्र भरती पाण्याच्या नसíगक वाटा बंद केल्याने येथील खाडीच नष्ट झाली असून या खाडी किनारी परदेशातील हजारो पक्षी थंडीच्या काळात येत असतात. मात्र त्यांचा बसेरा व खाद्य असलेले मासे गायब झाल्याने पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. खाडी किनारावरील या जागेत जेएनपीटीने चौथ्या बंदराकरिता मातीचा भराव केल्याने ऑक्टोबरपासून येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच त्यांचा अनेक वर्षांचा असलेला बसेराही उद्ध्वस्त झाला आहे.
या संदर्भात पक्षी मित्र व अभ्यासक खेद व्यक्त करत आहेत. पक्षी मित्रांनी केंद्रीय वन मंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीची नोंद घेण्याची मागणी इतर पक्षीप्रेमींनी केली आहे. तर आठ दिवसांपूर्वीच आलेल्या समुद्राच्या मोठय़ा उधाणाच्या वेळी उरण व पनवेल तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील शेकडो एकर भात शेतीत समुद्राचे खारे पाणी शिरले. त्यामुळे शेती नापिकी होण्याच्या मार्गावर आहे. सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर वेगाने विकास कामे सुरू असून या विकासकामांसाठी मातीचा भराव टाकीत असताना कंत्राटदारांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असून नसíगक नाल्यातील खारफुटीवरही मातीचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे येथील जैविक संपत्तीचेही नुकसान होत आहे. यामुळे या परिसरातील खाडीत मासेमारी करून आपली जीविका भागविणाऱ्या मच्छीमारांवरही आपला व्यवसाय गमाविण्याची वेळ आली आहे. खारफुटीची कत्तली संदर्भात उरण पोलिसात गुन्हेही दाखल झालेले आहेत. मात्र याप्रकरणी कोणावरही कारवाई झालेली नसल्याने कंत्राटदारांकडून राजरोसपणे खारफुटीची कत्तल करून भराव केला जात आहे.