कल्याणमधील वायलेनगर भागात गुरुवारी दुपारी आलिशान रेसिडेन्सी या इमारतीमधील चार घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरटय़ांनी सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. दिवसाढवळ्या चोरटय़ांनी चोऱ्या केल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.  आलिशान रेसिडेन्सीमध्ये दुपारच्या वेळेत दोन व्यक्ती कुरिअर देण्याच्या बहाण्याने आल्या होत्या, असे वृद्ध सुरक्षा रक्षकाने पोलिसांना सांगितले. या चोरटय़ांनी इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या माळ्यावरील एकूण चार सदनिकांचे दरवाजे कडी-कोयंडे काढून घरातील सोन्याचा   ऐवज चोरून नेला.