ख्यातनाम गिर्यारोहक, लेखक आणि संशोधकांच्या सानिध्यात त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये दिवसभराची ही मेजवानी मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे हिमालयन क्लबच्या वार्षिक अधिवेशनामुळे! अनेक दिग्गज गिर्यारोहकांचे रोमांचक अनुभव, किस्से हिमालय क्लबच्या वार्षिक अधिवेशनामध्ये ऐकायला मिळणार आहेत. नरिमन पॉइंटवरील एअर इंडिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात दोन दिवस हे सारे दृकश्राव्य माध्यमातून सर्वांना पाहायला-ऐकायला मिळणार आहे. माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उदघाटन शनिवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.  या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये पॅट्रीक मॅरो, बर्नार्ड मॅकडोनाल्ड, अनिंद्या मुखर्जी, कर्नल अनिल गोथ, हरीश कपाडिया, प्रदीपचंद्र साहू, दिव्येश मुनी, स्टीफन अल्टर आदींची व्याख्याने होणार असल्याचे हिमालयन क्लबच्या कार्यवाह नंदिनी पुरंदरे यांनी कळविले आहे.