scorecardresearch

वडिलांच्या आठवणीत गौहर खान झाली भावुक, शेअर केली पोस्ट

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

‘बिग बॉस ७’ची विजेती अभिनेत्री गौहर खानचे वडील जफर अहमद खान यांचे ५ मार्च २०२१ रोजी निधन झाले. प्रदीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. आता गौहर खान वडिलांच्या आठवणीत भावुक झाली आहेत. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘तुम्हाला जाऊन एक महिना झाला आहे. पप्पा तुमची मला खूप आठवण येते. तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही होतात. मी आत्तापर्यंत भेटलेल्या सर्वात स्टायलिश व्यक्तीपैकी तुम्ही एक होतात. एखाद्याला कोणतीही गोष्ट तुम्ही पटवून देत होतात’ या आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

मार्च महिन्यात गौहर खान वडिलांसोबत रुग्णालयात असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. तसेच तिने ‘कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’ अशी विनंती देखील चाहत्यांना केली होती. मात्र पाच मार्च रोजी गौहरची मैत्रीण प्रीती सिमोसने सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौहरच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘माझ्या गौहरचे वडील… ज्यांच्यावर माझे प्रचंड प्रेम होते… ज्यांनी त्यांचे आयुष्य अभिमानाने जगले…’ अशा आशयाचे कॅप्शन देत तिने श्रद्धांजली वाहिली होती.

मराठीतील सर्व वृत्तान्त ( Vruthanta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gauahar khan pens an emotional note about her late father avb