scorecardresearch

Premium

आषाढीसाठी पंढरीत प्रशासनाची तयारी

पंढरी नगरीत संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांचे पालख्यांसह शेकडो पालख्यांनी पंढरीस प्रस्थान ठेवले असून वारीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांसाठी पंढरी नगरी अन प्रशासन सज्ज झाले आहे.

आषाढीसाठी पंढरीत प्रशासनाची तयारी

पंढरी नगरीत संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यास २० दिवस उरले असून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांचे पालख्यांसह शेकडो पालख्यांनी पंढरीस प्रस्थान ठेवले असून वारीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांसाठी पंढरी नगरी अन प्रशासन सज्ज झाले आहे.
महसुल आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांचे आक्रमक पवित्र्याने संबंधित खाते प्रमुख ठेकेदार यांनी कामे पूर्ण करण्याचा झपाटा लावला आहे. शिवाजी चौक ते विवेकवर्धिनी विद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ब्लड बँक व सावरकर पुतळा ते इंदिरा गांधी चौक हे रस्ते पूर्ण झाले आहेत.
पंढरीतील लहान व्यावसायिकापासून ते मोठय़ा प्रासादिक व्यापाऱ्या पर्यंत सर्वाचीच तयारी जोरात चालु आहे. तर अधिकारी वर्ग बैठकावर बैठका घेऊन कोणत्या विभागाची काय तयारी झाली याचा आढावा घेत आहेत. प्रदक्षणा मार्गाची दुरुस्ती चालु आहे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम म. न. पा. ने. हाती घेतले आहे. वारीची जबाबदारी पोलीस प्रशासन तसेच महसुल प्रशासन यांचेवर असल्याने या विभागाचे तीनही अधिकारी दक्षता घेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Govt alert for ashadhi wari in pandharpur

First published on: 03-07-2013 at 02:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×