जेसीबी मशीनसाठी पाच लाखांची मागणी करून विवाहितेचा छळ

जे.सी.बी. मशीन खरेदीसाठी माहेरातून पाच लाखांची रक्कम आणत नाही म्हणून पत्नीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी बाबूराव शंकर राठोड व त्याचे वडील शंकर राठोड या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राठोड हे रत्नागिरी जिल्हय़ात दापोली येथे राहतात. प्रीति बाबूराव राठोड (वय २७, रा. सोनामाता नगर, विजापूर रोड, सोलापूर) हिने यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार सोलापूरच्या प्रीति हिचा विवाह काही वर्षांपूर्वी दापोलीच्या बाबूराव राठोड याजबरोबर झाला होता. परंतु बांधकाम व्यवसायासाठी जे.सी.बी. मशीन खरेदी करायची असल्याने त्याकरिता पाच लाखांची रक्कम कमी पडते. ही रक्कम प्रीती हिने माहेरातून आणावी म्हणून सासरच्या मंडळींनी तगादा लावला. दापोलीसह गुलबर्गा, हैदराबाद व सोलापूर येथे तिचा छळ करण्यात आला. माहेरातून पाच लाखांची रक्कम आणली नाहीतर सासरी नांदविण्यासाठी ठेवणार नाही, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे वैतागून तिने पोलिसात धाव घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Harassment of married women for 5 lakh

ताज्या बातम्या