डॉ. हेडगेवार यांच्या १२५ व्या जयंतीवर्षांनिमित्त पार्ल्यात कार्यक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म १८८९ मधील वर्षप्रतिपदेला झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म १८८९ मधील वर्षप्रतिपदेला झाला. सध्या त्यांचे १२५ वे जयंतीवर्ष सुरू आहे. त्यानिमित्त विलेपार्ले येथील अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांनी एकत्र येऊन एक कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या शनिवारी, २१ जून रोजी पु. ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर, विलेपार्ले (पूर्व) येथे सायंकाळी ६.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इतिहासाचे अभ्यासक, माजी आमदार डॉ. अशोक मोडक उपस्थित राहणार आहेत. तर राज्यसभेचे खासदार भारतकुमार राऊत कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. या वेळी संजय पंडित व सहकारी राष्ट्रभक्तीपर गीते सादर करणार आहेत. डॉ. व. कृ. कुंटे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hedgewar 125th birth anniversary

ताज्या बातम्या