होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद डॉक्टरांना भविष्यात अ‍ॅलोपॅथीची नियमानुसार प्रॅक्टीस करता येईल. यासाठीचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात येत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५ जूनपूर्वी याला तत्वत मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी झाल्यास त्याची पूर्तता करण्यात येईल, तसेच अकोल्यात १५७ कोटींचे कॅन्सर रुग्णालय स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्याबाबतच्या निर्णयाची लवकर अंमलबजावणी होईल. राज्यातील होमिओपॅथी, युनानी व आयुर्वेद डॉक्टरांचा अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टीसचा मुद्दा अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या विषयावर डॉ.कोल्हे समिती स्थापन करण्यात आली होती.
 महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने याविषयी तोडगा काढला आहे. यासंबंधीच्या कन्डेन्स कोर्सला विधि मंत्रालयाची मान्यता मिळाल्याबरोबर मंत्रिमंडळात याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांचा प्रस्तावित ८ मे पासूनचा संप मागे घ्यावा, अशी विनंती मंत्री डॉ. गावित यांनी केली आहे.
इतर मुद्यांवर बोलताना त्यांनी एनआरएचएमअंतर्गत होमिओपॅथी डॉक्टरांना संधी देण्याचा विचार होऊ शकतो, असे स्पष्ट केले. तसेच अकोला वैद्यकीय महाविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रस्ताव अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेकडे पाठविण्यात आला आहे व येथील विस्ताराचा देखील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, परिषदेचे सदस्य डॉ.व्ही.आर.कविश्वर, डॉ. दिनेश बच्छाव, डॉ.किशोर मालोकार आदींची उपस्थिती होती.

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…