महिला सबलीकरणासाठी झटणाऱ्या येथील आदर्श महिला गृहउद्योग संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. चंद्रकला भार्गव यांचा अमेरिकेत सन्मान करण्यात आला. इंडियन डेव्हलपमेंट कोवालिशन अमेरिका या संस्थेतर्फे शिकागो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील बाराजणांना आमंत्रित केले होते. महाराष्ट्रातील प्रा. भार्गव या एकमेव महिला कार्यकर्त्यां होत्या.
परिषदेत प्रा. भार्गव यांनी महिला सबलीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली व महिलांचा सर्वागीण विकास या विषयावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने अमेरिकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘मुलगी झाली हो’ हा एकपात्री प्रयोगही त्यांनी अमेरिकेत सादर केला. प्रा. भार्गव यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत ४० प्रयोग केले. अमेरिकेतील प्रिस्टन युनिव्हर्सटिीतही त्यांना पाचारण करण्यात आले होते
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2013 रोजी प्रकाशित
लातूरकर चंद्रकला भार्गव यांचा अमेरिकेमध्ये सन्मान
महिला सबलीकरणासाठी झटणाऱ्या येथील आदर्श महिला गृहउद्योग संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. चंद्रकला भार्गव यांचा अमेरिकेत सन्मान करण्यात आला.
First published on: 20-12-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honour in america chandrakala bhargav latur