सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांनी नातेसंबंधांकडे मनोविश्लेषणात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकातून केला. अश्विनी एकबोटे, शरद पोंक्षे, जयतं घाटे, ज्ञानदा पानसे, सुचेत गवई यांच्या भूमिका असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केले आहे. या गाजलेल्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग रविवार, २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे होणार आहे.
गतिमान नाटय़ आणि विचार-भावनांच्या आंदोलनातले बारकावे टिपणाऱ्यांसाठी या संहितेमध्ये अंतर्मनातले कवडसे असणारे हे नाटक आहे. या शतकमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ रंगकर्मी आणि सिने दिग्दर्शक सई परांजपे, सुरेश खरे, दया डोंगरे तसेच मान्यवर पत्रकार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.