लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी लांबलचक झाल्याने निवडणूक यत्रणेला इलेक्ट्रानिक व्होटिंग मशिन्स अर्थात, ई.व्ही.एम.ची आयात कमी उमेदवार असलेल्या मतदारसंघातून करावी लागत आहेत.
एका ई.व्ही.एम म्हणजे मतदान यंत्रावर १५ उमेदवारांची नावे अधिक वरीलपकी कुणी नाही अर्थात, ‘नोटा’ अशी सोळा बटनेच बसत असल्याने १६ पेक्षा अधिक उमेदवार असल्यास एका मतदान केंद्रावर त्या प्रमाणात ई.व्ही.एम.ची व्यवस्था करावी लागते. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात १८ लाख मतदार, २६ उमेदवार आणि २००९ मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर याप्रमाणे ४ हजार १८ मतदार यंत्रांची आवश्यकता आहे.
निवडणूक विभागाच्या स्ट्राँग रुममध्ये २ हजार ७३ यंत्रे असून त्यातील ११५ यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड आहे.
आता आणखी २ हजार यंत्रांची आयात अशा मतदारसंघातून करावी लागणार आहेत जेथे उमेदवारांची संख्या १६ पेक्षा कमी आहे.
विदर्भात सर्वाधिक उमेदवार नागपूर (३३) मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी अकोला (७) व त्या खालोखाल भंडारा-गोदिया (२६), यवतमाळ-वाशीम(२६) मतदारसंघात उमेदवार आहेत. रामटेक (२३), वर्धा(२१), अमरावती (१९), चंद्रपूर, बुलढाणा (१७), (१८), गडचिरोली-चिमूर (११) मतदारसंघात आहेत. त्यामुळे विदर्भात जवळपास जास्तीच्या साडे तेरा हजार मतदान यंत्रांची आयात करावी लागणार आहेत. यवतमाळ मतदारसंघात १९९१ मध्ये २६, १९९६ मध्ये २९, १९९८ मध्ये १० आणि १९९९ मध्ये फक्त ६ उमेदवार मदानात होते.
२००४ मध्ये ई.व्ही.एम.चा वापर सुरू झाला त्यावेळी ९ उमेदवार उभे होते, तर २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत यवतमाळ-वाशीमची निर्मिती झाली तेव्हा २८ उमेदवार उभे होते. यावेळी अर्थात, २०१४ च्या १६ व्या लोकसभेसाठी तब्बल २६ उमेदवार िरगणात आहेत.