विविध पक्षांचे नेते, पत्रकार, वकील आणि सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण धमकावल्याने वादग्रस्त ठरलेले कर्जतचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांची अखेर पारनेर येथे बदली झाली.
ढोकले हे जामखेडहून जातीय दंगलीचा शिक्का घेऊनच येथे हजर झाले होते. कर्जत येथेही त्यांनी पत्रकारांना धमकावले, शेतक-यांच्या पाणी आंदोलनावर मांदळी येथे अमानुष लाठीमार केला. महिला वकिलाला शिवीगाळ केली. अलीकडेच त्यांनी माहीजळगाव येथे चोरांना पकडणाऱ्या नागरिकांवरच गुन्हे नोंदवले. अशा अनेक प्रकरणांनी ते वादग्रस्त ठरले होते. पत्रकार संघाने त्यांच्याविरुद्ध केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आदींकडे तक्रारअर्ज केले होते. विविध राजकीय पक्षांनीही त्यांच्या बदलीची मागणी केली होती.