आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण सिमेंट निर्माता असलेल्या व्हिकॅट ग्रुपने दक्षिण महाराष्ट्रातील बाजारपेठेत भारतीय सिमेंट हा ब्रँड दाखल झाल्याची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
 ग्राहकांसाठी सिमेंट ऑन कॉल ही वैशिष्टय़पूर्ण सेवा कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. शहरापासून १० किलोमीटरच्या अंतरात सिमेंट घरापर्यंत वाहनभाडे न आकारता मोफत पोहोचवले जाणार आहे. व्हिकॅट ग्रुपचे भारतातील विपणन शाखेचे मुख्य एम. रवींद्र शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की व्हिकॅट ग्रुप फ्रान्स व सागर सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने गुलबर्गा येथे सिमेंट उत्पादन कंपनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पातील सिमेंटची विक्री भारतीय सिमेंट या ब्रँड नावाखाली होणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्हय़ांतील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ओपीसी ४३ ग्रेड, ओपीसी ५३ ग्रेड, पीपीसी व पीएसपी या प्रकारच्या सिमेंटची निर्मिती केली जाते. भारतीय सिमेंटचे २२३८ डिलर्स असून विक्रीची आघाडी सांभाळणारे सहा हजारांहून जास्त सबडिलर्स आहेत. व्हिकॅट ग्रुपची देशातील सिमेंट निर्माण क्षमता प्रतिवर्ष ७.७५ दशलक्ष टन्स इतकी आहे. त्यामुळे ते दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण सिमेंट निर्मात्यांपैकी एक बनले आहे. भारतीय सिमेंट प्रॉपिलीनच्या लॅमिनेट केलेल्या बॅग्जमध्ये सिमेंट पुरविते. भेसळ व सिमेंट कमी होण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी या बॅग्जची खास रचना करण्यात आली आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. फ्रान्समधील व्हिकॅट ग्रुपने कृत्रिम सिमेंटचा शोध १८१७ मध्ये लावला. हा ग्रुप सिमेंट, रे-मिस्क्ड काँक्रीट व तत्ससंबंधित उत्पादने या तीन व्यवसाय शाखांमध्ये तसेच इतर उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. हा ग्रुप फ्रान्स, स्वित्र्झलड, इटली, अमेरिका व भारतासह ११ देशांत कार्यरत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.