बालमजुरी प्रथेविरोधात जनजागरण मोहीम

बालक दिनाचे औचित्य साधून अप्पर कामगार आयुक्त. चाईल्ड लाईन व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बालमजुरीच्या प्रथेविरुद्ध जिल्ह्य़ात २१ नोव्हेंबपर्यंत जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे.

बालक दिनाचे औचित्य साधून अप्पर कामगार आयुक्त. चाईल्ड लाईन व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बालमजुरीच्या प्रथेविरुद्ध जिल्ह्य़ात २१ नोव्हेंबपर्यंत जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील गांधीबाग, कसुरचंद पार्क, महाला, रामनगर मैदानातील फटाका मार्केटपासून जगजागरण मोहिमेचा प्रारंभ लहान मुले व पालकांच्या  हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला अप्पर कामगार आयुक्त लाकसवार, कामगार अधिकारी दुबे, टिक्म, नगराळे, चाईल्ड लाईनचे जोबी, सांजेस यांचे सहकार्य लाभले.  बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते, दुकान निरीक्षक, कामगार अन्वेशक जागृती सप्ताहात सहभागी झाले. या मोहिमेस विविध ठिकाणी जनतेचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Janjagran against child labour