कल्याण फिल्म फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन

कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. दर्जेदार चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. दर्जेदार चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. उद्घाटनानंतर झालेल्या रंगारंग कार्यक्रमाने रसिकांची दाद मिळवली. वासुदेव बळवंत फडके मैदानात आयोजित महोत्सवाच्या उद्घाटनाला खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते. संदीप नवरे, संदीप गायकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. कल्याण परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळावी, तसेच तंबूतील सिनेमा जगावा या उद्देशातून प्रथमच कल्याणमध्ये फिल्म फेस्टिव्हलचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे संदीप गायकर यांनी सांगितले. ऐतिहासिक कल्याणची नवीन ओळख या फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशासमोर जाईल. नागरिकांना नवे देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे असे खा. कपिल पाटील म्हणाले. या वेळी अभिनेत्री सई ताम्हणकर, सचित पाटील, मंगेश बोरगावकर आदी कलाकार उपस्थित होते. नृत्य, गाण्यांच्या कार्यक्रमांनी कार्यक्रमात धमाल आणली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kalyan film festival grand opening