नाशिकला टेबल टेनिसमध्ये कास्याचा दुहेरी मुकुट

धुळे येथे झालेल्या ४४ व्या आंतरजिल्हा आणि ७५ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत नाशिकच्या कॅडेट मुले व पुरुष संघांनी कास्यपदक मिळविले.

धुळे येथे झालेल्या ४४ व्या आंतरजिल्हा आणि ७५ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत नाशिकच्या कॅडेट मुले व पुरुष संघांनी कास्यपदक मिळविले.
प्राथमिक साखळी फेरीत पुरुष गटात नाशिकने चंद्रपूरचा तसेच परभणीचा ३-० असा पराभव करीत बाद फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीत सोलापूरचा ३-२ ने पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या फेरीत ठाण्याने त्यांच्यावर ३-० अशी मात केली. कॅडेट मुलांच्या साखळी स्पर्धेत नाशिकने भंडाऱ्यावर ३-० तर, यवतमाळ जिल्ह्य़ाचा ३-१ असा सहज पराभव करीत बाद फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीत जळगावचा ३-१ पराभव करणाऱ्या नाशिकने उपांत्य फेरीत पुण्यालाही जोरदार टक्कर दिली. पुण्याने ३-२ असा सामना जिंकल्याने नाशिकला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kasya win the second medel in nasik table tennies