तीन वर्षांपूर्वी उजाड झालेली खासबाग होतेय पुन्हा ‘खास’!

शहरातील बच्चे कंपनीला आनंद घेता यावा, यासाठी िबदुसरा नदीपात्राशेजारी असलेली खासबाग ४ वर्षांपूर्वी उजाड झाली होती. या बागेतील जागेचा गरवापर वाढला होता. हिरवळ पूर्णत: मातीत मिसळली.

शहरातील बच्चे कंपनीला आनंद घेता यावा, यासाठी िबदुसरा नदीपात्राशेजारी असलेली खासबाग ४ वर्षांपूर्वी उजाड झाली होती. या बागेतील जागेचा गरवापर वाढला होता. हिरवळ पूर्णत: मातीत मिसळली. तीन वर्षांपासून उजाड पडलेली ही खासबाग पुन्हा ‘खास’ होत असून, बच्चे कंपनीला या बागेत मनसोक्त बागडता येणार आहे.
बीडची ओळख विविध ठिकाणांच्या माध्यमांतून होते. खजाना विहीर, दीपमाळ, कंकालेश्वर अशा ऐतिहासिक नावांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. या नावांबरोबरच खासबाग म्हटले, की बीड अशी परिस्थिती एकेकाळी होती. िबदुसरा नदीपात्राशेजारी असलेली खासबाग बीडमध्येच नव्हे, तर जिल्हय़ात ओळखली जात होती. खासबाग येथील खेळणी, हिरवळ व प्राणिसंग्रहालय हे सर्वाचे लक्ष वेधून घेत. नगरपालिकांच्या माध्यमातून त्याची देखरेख केली जात असे. बागेसमोर असलेल्या खासबाग देवीच्या मंदिरामुळे या बागेला खासबाग म्हणून ओळखले जाऊ लागले. ती ओळख आजही कायम आहे.
तीन वर्षांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना योग्य देखभालीअभावी इतरत्र हलवावे लागले. तेथील हिरवळही पूर्णत: सुकून गेली, खेळणी तुटल्या. त्यामुळे खासबागेचे वैशिष्टय़ इतिहासजमा झाल्याचे दिसू लागले. उजाड जागेचा अन्य विविध कारणांसाठी वापर होऊ लागला. त्या भागातील लहान मुले क्रिकेटचे मदान म्हणून जागेचा वापर करू लागले. गरप्रकारही वाढले. आंबट शौकिनांसह मद्यप्राशन करणारेही जागेचा वापर करू लागले. खासबाग बंद झाली, तेव्हापासून बच्चे कंपनींची गरसोय होत होती. नगरपालिकेने इतर दोन उद्यानांची निर्मिती केली. परंतु खासबागसारखी बाग तयार करण्यात अपयश आले. त्यामुळे पालिकेने पुन्हा खासबागेचे नूतनीकरण करण्याचे ठरवले. सहा महिन्यांपासून खासबागेतील काम युद्धपातळीवर सुरू आहे. दहा ते बारा मजुरांकडून दररोज काम करून घेतले जाते. झाडांची लागवड, गवताची कापणी, खुरपणी, खेळणी दुरुस्ती अशी कामे सुरू आहेत. खासबागेने कात टाकली असून आकर्षक झाडे सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. कारंज्याची दुरुस्ती करण्यात आली असून, तिच्याभोवती लोखंडी जाळी बसवली आहे. ठिकठिकाणी दिवे बसवले आहेत. गवताचे आकर्षक व्यासपीठही तयार केले आहे. खासबागेत नवीन खेळणी आणण्याचे पालिकेने ठरवले आहे. आता लवकरच खासबाग पुन्हा बच्चे कंपनीच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती खासबागेची देखभाल करणारे एस. एस. मोटे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Khasbag garden again renewal

Next Story
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धा
ताज्या बातम्या