असून ठाणे जिल्हासंपर्क नेते म्हणून जिल्ह्य़ात पक्षीय स्तरावर क्रमांक एकचे पद मिरवणारे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार एकनाथ िशदे यांच्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी ठाणेच नव्हे तर जिल्ह्य़ातील प्रमुख शहरे, गावांच्या नाकानाक्यांवर होर्डिग, फलक उभे केल्याने शिवसैनिकांच्या या ‘शो’बाजीविषयी सर्वसामान्य नागरिक तीव्र अशी नाराजी व्यक्त करू लागला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला जेमतेम अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
शिवसेनेचे संपर्कनेते एकनाथ िशदे यांचा नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. बाळासाहेबांच्या निधनामुळे आपण हा वाढदिवस साजरा करणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. याशिवाय भेटावयास येणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, भेटवस्तूंऐवजी दुष्काळग्रस्तांसाठी अन्नधान्य घेऊन यावे, असे आवाहनही शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या निधनामुळे एकीकडे हा समंजसपणा दाखविला जात असताना ठाणे, डोंबिवलीतील गल्ली-कोपऱ्यांमध्ये िशदेसाहेबांचे समर्थक मात्र सुसाट सुटले आहेत. वाढदिवसाला आठवडाभर आधीच  शिवसैनिक जागोजागी होर्डिग्ज उभारू लागले असून यामुळे शहराच्या नियोजनाचे अक्षरश तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसू लागले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत महापालिकेने जाहिरातीसाठी काही जागा ठरवून दिल्या आहेत. तेथे परवानगी घेऊन, पैसे भरून जाहिराती करता येतात. या जागांवर आपल्या नेत्याची जाहिरात करणे एकवेळ समजू शकते. मात्र, रस्त्यांच्या आडोशाला, पदपथांवर, खड्डे खोदून बिनधोकपणे होर्डिग्ज उभारले गेले असून स्वच्छ ठाण्याची घोषणा करणारे एकनाथ िशदे मात्र हे सगळे उघडय़ा डोळ्यांनी पाहात आहेत.
अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, होर्डिग, फलक उभारण्याविरोधात ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव जोरदार मोहीम हाती घेतात असा आजवरचा अनुभव आहे. महापालिकेचे नवेकोरे खड्डे खोदून उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनाही यावेळी राजीव यांनी हिसका दाखविला होता. एकनाथ िशदे यांच्या वाढदिवसाचे अनधिकृत फलक मात्र महापालिकेस का दिसले नाहीत, असा सवाल ठाणेकर उपस्थित करत आहेत.