खामगाव तालुक्यातील सत्तेची किमया काहीही करू शकते, हे आता एमसीएन केबल कनेक्शनच्या शहरातील सव्‍‌र्हेवरून स्पष्ट झाले आहे. कारण, सानंदांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या एमसीएनचे कनेक्शन्स आता वाढले असून तो आकडा ५८५४ वर पोहोचला आहे.
गेल्या ८ ते १० महिन्याच्या तुलनेत ते प्रमाण २ हजाराने वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, एमसीएन कनेक्शनचा नव्याने सव्‍‌र्हे व्हावा याबाबत आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवरून हा सव्‍‌र्हे झाल्याचे पुढे आले आहे.
खामगाव शहर व ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात एमसीएनचे कनेक्शन्स आहे, परंतु प्रत्यक्षात कनेक्शनचा आकडा कमी दाखवून शासनाचा महसूल बुडविला जात असल्याची तक्रार गेल्या ८ ते १० महिन्यापूर्वी दत्तगुरू मंडळाचे अध्यक्ष ओम शर्मा यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सव्‍‌र्हे करण्यात आला होता, परंतु पुढे काय झाले, हे मात्र कळू शकले नव्हते. कारण, त्यावेळचे आमदार सानंदा होते. त्यामुळे सव्‍‌र्हे करणारा महसूल विभाग होता. या विभागाने त्यावेळी कसा सव्‍‌र्हे केला, हे सांगण्याची गरज नाही, परंतु आता सत्ताबदल होऊन अ‍ॅड.आकाश फुंडकर आमदार झाले. त्यांनीच याबाबतची लक्षवेधी हिवाळी अधिवेशनात मांडली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील केबल कनेक्शन सव्‍‌र्हेचे आदेश देण्यात आले होते. यासाठी ७० कर्मचाऱ्यांचे १४ पथक नेमण्यात आले होते.
यात महसूल व नगर पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश होता. गेल्या महिन्याभरापासून सुरू झालेल्या या सव्‍‌र्हेचा आकडा अखेर शनिवारी जुळवला गेला. हा आकडा ५८५४ वर गेला आहे, तर डीटीएच केबलधारकांची संख्या २९६३ आहे. याबाबत तहसीलदार टेंभरे यांना विचारले असता त्यांनी शहरात एमसीएनचे २५ केबल ऑपरेटर असून या ऑपरेटरांनाही या कनेक्शनबाबत विचारणा होऊन चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात गेल्या १० वर्षांपासून एमसीएनचे जाळे आहे. मोठय़ा प्रमाणात कनेक्शन्स असताना गेल्या वेळी म्हणजेच, ८ ते १० महिन्यांपूर्वी हा आकडा ३५०० वरच होता, परंतु आता तो ५ हजारावर गेला आहे. त्यामुळे २ हजारावर कनेक्शन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाढलेल्या कनेक्शनचे शुल्क आता १० वर्षांपासून वसूल केले जाईल काय, असा प्रश्नही निर्माण होत आहे. प्रती कनेक्शन ३० रुपयाचे शुल्क शासनदरबारी भरावा लागत आहे. त्यामुळे हे शुल्क लाखोच्या घरात जाणार आहे. हे शुल्क वसूल होईल का, हा प्रश्न निर्माण होत आहे.

Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार
Who is throwing stones at houses since a month
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?