विदर्भ विकासाच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या मिहान प्रकल्पाची पाऊले आता प्रगतीकडे वळू लागली आहेत. येथे नवनवीन कंपन्या येऊ घातल्या असून आतापर्यत १२ कंपन्यांचे उत्पादन सुरू झाले आहेत. तर १७ कंपन्या लवकरच सुरू होणार आहेत. मिहानमध्ये सुरू होत असलेल्या कंपन्यामुळे विदर्भातील सुशिक्षित बेरोजरागारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असून अप्रत्यक्षपणे हजारो नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मिहानसाठी एकूण २९६१.३५ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये भामटी ५३ हेक्टर, चिंचभवन २०७.९१, जयताळा ३७.७०, शिवणगाव ५९३.४८, सोनेगाव ०.०२, इसासनी १८१.५०, सुमठाणा १०८.८६, कलकुही ४५२.२८, खापरी रेल्वे ४२५.५७, दहेगाव ४०५.७९, तेल्हारा ४६५.८२, जामठा ३.८७ आणि परसोडी येथील २५.५४ हेक्टरचा समावेश आहे. यासाठी एकूण ४८७ कोटी ९७ लाख रुपये वाटप करण्यात आले. मिहान प्रकल्पाच्या विकासासाठी जयताळा आणि भामटी येथील अंदाजे ४० हेक्टर जमीन संपादित करावयाची राहिली आहे.
या मिहान क्षेत्रात सिनोस्पेअर, हेज्झावेअर बीपीएस (कॅलीबर पॉइंट), ल्युपीन फॉर्मा, स्मार्ट डाटा, टीएएल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन, एडीसीसी इन्फोकॉम, डॉ. एम. होप सॉफ्टवेअर, एबीएक्स, ग्लोबल लॉजीक, इम्फोर्मेटिक सोल्युशन क्लाऊडडाटा, झिओन सेल्युशन या बारा कंपन्यांचे उत्पादन सुरू झाले आहेत. विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) बीपीसीएल पेट्रोल पंप, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल आणि फ्युचर ग्रुप विअरहाऊस सुरू झाले आहेत. मिहानमध्ये डायट फुड इंटरनॅशनल, हास कॉर्पोरेशन, कनव अ‍ॅग्रोनॉमी, कोलॅन्ड डेव्हलपर्स, मेटाटेच, एनएसीआयएल (एअर इंडिया बोईंग), परसेप्ट वेब सोल्युशन, प्रवेश एक्सपोर्ट, टाटा कन्सलटन्सी सर्विसेस आणि टेक महिंद्रा या दहा कंपनीचे इमारत बांधणीचे काम जोरात सुरू आहे. तर सेझमध्ये फर्स्ट सिटी बाय एम/एस रिटॉक्स, महिंद्र लाईफस्पेस, मोराज फायनाझ, मोराज इन्फ्रा, फोयेनिक्स इन्फ्रा, रेल टर्मिनल बाय एम/एस काँकर आणि टीसीआय वेअरहाऊस या सात कंपन्याच्या इमारतींचे बाधकाम सुरू आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती प्राप्त झाली आहे. मिहान क्षेत्रात एकूण ५५ कंपन्यांनी तर सेझमध्ये १४ कंपन्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. मिहानमध्ये अभिजित एमएडीसी नागपूर एनर्जी प्रा. लि., एडीसीसी इन्फोकॅड प्रा. लि., एअर इंडिया, आसरा रियालटी व्हेन्च्युअर प्रा. लि., ब्ल्यू प्लॅनेट इन्फोसोल्यूशन (इंडिया) प्रा. लि. पुणे, बोइंग इंक, बीपीसीएल एटीएफ फॅसिलिटी, बुल्डींग रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सर्विसेस प्रा. लि. कोलकाता (अम्बुजा रियाल्टी), सिनोस्पेअर इंडिया प्रा.लि., डायट फुड इंटरनॅशनल, डीेलएफ लि., डय़ूक एव्हीएशन इंजिनिअरिंग प्रा. लि., गम फार्मा, हल्दीराम फुड्, इन्फोसिस, एल अ‍ॅण्ड टी, लीला व्हेन्च्यूअर प्रा. लि., लोकमंगल इन्फो टेक यूएसए, ल्युपिन, मॅक्स एरोस्पेस अ‍ॅण्ड अ‍ॅव्हीएशन लि., आर.अ‍ॅण्ड डी टेक प्रा. लि. या कंपनींचा त्यात समावेश आहे. आर्यन फुड प्रा. लि., बॅक्युरिल इंडस्ट्रीज, इन्फोसेप्टस, इनोव्हा फार्मा अ‍ॅक्टीव्ह, नितिका फार्मा, रिवा टेक्नॉलॉजीस, थर्मोलॅब ग्रुप, युको बँक, विदर्भ टेक्नो हब आणि व्हच्र्युअल गॅलक्सी प्रा. लि. या दहा कंपन्यांनी आपले उद्योग स्थापन करण्यास पसंती दर्शवली आहे.