मोरा ते भाऊचा धक्का लाँच सेवा बंद

वादळी वारा आणि समुद्रातील महाकाय लाटांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यान प्रवासी वाहतूक करणारी मोरा मुंबई लाँच सेवा दोन दिवसांपासून बंद

वादळी वारा आणि समुद्रातील महाकाय लाटांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यान प्रवासी वाहतूक करणारी मोरा मुंबई लाँच सेवा दोन दिवसांपासून बंद करण्यात आलेली आहे. पावसाळ्यात जलप्रवास धोकादायक असला तरी उरण ते मुंबई दरम्यानची मोरा ते भाऊचा धक्का ही लाँच सेवा बारमाही सुरू असते. त्यामुळे दक्षिण मुंबईत नोकरीनिमित्त जाणारा चाकरमानी या मार्गाचा वापर करीत असतात. सध्या लाँच सेवा बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.  सध्या बंद असलेली सेवा वातावरणात बदल झाल्यानंतर पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहिती लाँचचालकांनी दिलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mora to bhaucha dhakka ferry service close