अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी (दि. १६) एकच सामायिक प्रवेश परीक्षा (एमटी सीईटी २०१३) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात १२ शाळा-महाविद्यालयांची परीक्षा कें द्रे म्हणून निवड केली  असून एकू ण ३ हजार ४१७ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.
एस. एस. चौधरी यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्ह्याचे केंद्रप्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी व्ही. एम. गावंडे यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा होणार आहे. सर्व उमेदवारांनी सकाळी सव्वानऊ वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर गुरुवारी सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत कलम १४४ लागू राहील, असे कळविण्यात आले आहे.