कंटेनरची मोटारीला धडक; माय-लेकाचा जागीच मृत्यू

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारास निघालेल्या मोटारीला कंटेनरने धडक दिल्याने मोटारीतील माय-लेक जागीच ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारास निघालेल्या मोटारीला कंटेनरने धडक दिल्याने मोटारीतील माय-लेक जागीच ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास गेवराईपासून काही अंतरावर बागिपपळगावजवळ हा अपघात घडला.
अमोल प्रकाश देशमाने (औरंगाबाद) हे नातेवाईकाच्या अंत्यविधीस कुटुंबासह मोटारीतून कळंबला जात होते. मोटारीला (एमएच २० यू ५०२६) कंटनेरने (के ए ५१ ए ३६३८) धडक दिली. यात अमोल देशमाने (वय ३२), त्यांची आई पद्मा प्रकाश देशमाने (वय ५५) हे माय-लेक जागीच ठार झाले. प्रकाश शांताकुमार देशमाने (वय ६०), सुशील संजय देशमाने (वय २७), प्रणयकुमार शांताकुमार देशमाने (वय ४५) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांनी औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mother and son died in road accident