गोरेगावातील काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या फिनिक्स फाऊंडेशन या संस्थेने अलीकडे पाटकर महाविद्यालयाच्या सभागृहात विजय तेंडुलकर महोत्सव साजरा केला. या महोत्सवात तेंडुलकरांनी लिहिलेल्या मादी, अजगर आणि गंधर्व व ओळख अशा तीन एकांकिका सादर करण्यात आल्या.श्रेया बुगडे, संकर्षण कऱ््हाडे, अनिकेत साने, अक्षता गायकवाड, प्रसाद मोडक, शिल्पा साने, देवेंद्र जोशी, करिश्मा साळुंखे, प्रीतेश सोढा, वैभव केळकर आदी कलावंत यात सहभागी झाले होते. आता दर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी एका साहित्यिकाची निवड करून त्याच्या साहित्यकृतींशी संबंधित कार्यक्रम सादर होणार आहेत. रसिकांनी मोठय़ा संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी संपर्क- सुदेश सावंत ९८२१३५५२६४ किंवा गिरीश सावंत ९८६७४४४४१८.



