आषाढी एकादशी या वर्षी बुधवार, ९ जुलैला आली आहे. परंतु पुढील वर्षी अधिक आषाढ महिना येणार असल्यामुळे आषाढी एकादशी अठरा दिवस उशिरा म्हणजे सोमवार २७ जुलै २०१५ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. पुढील वर्षी बुधवार, १७ जून ते गुरुवार १६ जुलै २०१५ अधिक आषाढ महिना येत आहे. यामुळे नारळीपौर्णिमा, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण उशिरा येणार आहेत, असे सोमण यांनी सांगितले.